- तपासादरम्यान त्याच्याकडे आढळला लोखंडी कोयता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी आरोपीला तडीपार केले आहे. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो कोणतीही परवानगी न घेता पिंपरी चिंचवड शहरात आला. पोलिसांनी त्याला अटक केली.
त्याची झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळला. सोमवारी (दि. ११) निगडीतील ओटास्कीम येथील स्मशानभूमीजवळ ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई अमोल साळुंखे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव अनिल सरोदे (वय २४, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















