न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- चिखली येथील कृष्णानगर चौकातील श्री. महावीर ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समनचे काम करणाऱ्या आरोपीकडे फिर्यादीने ग्राहकांना दाखवण्यासाठी दागिने दिले होते.
त्यातील १३९६ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, ११०० ग्रॅम सोन्याचे नेकलेस व राणीहार असलेला बॉक्स, तसेच साक्षीदार यांनी दिलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण एक कोटी १८ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी सेल्समन हा मालकाची नजर चुकवून चोरी करून निघून गेला.
शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मुकेश तिलोकराम सोलंकी (वय ३०, रा. मोरेवस्ती, चिखली, मुळगाव वोपारीगाव, ता. मारवाड जंक्शन, जि. पाली, राजस्थान), असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. जितेंद्र अशोक जैन (वय ३५, रा. निगडी) यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. १६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
















