न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ जाने.) :- सोशल मीडियावर एखादी व्यक्ती आक्षेपार्ह पोस्ट टाकते. त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसरविले जाते. यातून वाद विवाद आणि सामाजिक तेढ निर्माण होते. मूळ पोस्ट टाकणारा बाजूला राहतो आणि अन्य लोकांमध्येच वाद होतो. ही दूषित प्रवृत्ती आहे. ती कमी होऊन युवकांनी वाचन आणि चर्चांमधून विचारमंथन केले पाहिजे, असे मत नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ चिंचवड-पुणे यांच्या वतीने ‘शिशिर व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे, मनोहर दीक्षित, संजय खानोलकर, संजीव दात्ये आदी उपस्थित होते.











