न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महापालिकेने नगरसेवक तुषार हिंगे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्धतेसाठी मैदान सपाटीकरणास अडथळा ठरणा-या ८५ झाडांवर कु-हाड चालविली आहे. याची तक्रार आयुक्तांकडे केली असतानाही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले व या गोष्टीस बढाई दिली, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपचे स्थानिक नगरसेवक तुषार हिंगे यांनी फरगडे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शिवशाहू उद्यानासमोरील आरक्षण क्रमांक १२३ ही मोकळी जागा तीन दिवसीय खाद्य महोत्सवासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिकेस (७ जाने.) रोजी पत्र पाठविले होते. त्याच दिवशी आपण आयुक्तांना पत्र देऊन तक्रार केली होती. झाडे आणि सीमाभिंत तोडून हे काम चालू आहे. तथापि, आयुक्तांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करु असे सांगितले.
मात्र, त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे महापालिकेचे झाडे लावा, झाडे जगवा हे अभियान फसवे असल्याचे या निम्मिताने पहावयास मिळाले असल्याचे, कदम यांनी यावेळी सांगितले.











