न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- रावसाहेब दानवे यांनी आपली उंची आणि पात्रता पाहून बोलावे, हेच दानवे शेतक-यांना कर्जमाफी देण्यावरुन शिवीगाळ करतात, शेतक-यांना साले म्हणून तुच्छ वागणूक देतात. त्यांना शेतकरी रडतात साले म्हणून हिणवतात. दानवेंच्या परवाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरही ताशेरे ओढले. शहरातील तसेच राज्यातील स्मार्ट सिटीच्या कामात अप्रत्यक्ष हस्तक्षेप करीत, मुख्यमंत्री मर्जीतल्या ठेकेदाराला कंत्राट देण्याचे मुंबईत बसून ठरवितात. शहरातील तसेच राज्यातील स्मार्ट सिटीच्या कामात अप्रत्यक्ष हस्तक्षेप करतात, त्यांच्या या टेंडर हस्तक्षेपाची चाैकशी केल्यास मुख्यमंत्र्यांना अटक होईल, असा टोलाही वाघेरे यांनी भाजपला लक्ष्य करताना यावेळी हाणला. तसेच श्रीरंग बारणे यांच्याही कोण पार्थ पवार? चा वेध घेताना बारणे यांच्यावरही टीका केली.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, आदी उपस्थित होते.











