- कंपनीचे मोठे नुकसान; आगीत कंपनीचा एक प्लांट जळून खाक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरीतील महिंद्रा कंपनीच्या समोरच असणाऱ्या डॉ. बेक कंपनीत आज शनिवारी (दि. २३) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा व धुरामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. कंपनीला शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय. कंपनीचे मात्र, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत कंपनीचा एक प्लांट जळून खाक झाला आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.