- नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२१) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणीगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्याच्या कामास पालिकेने मंजुरी दिली. यासाठी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी पाठपुरावा केला. आयुक्तांनी पुतळा उभारणीच्या कामाचे आदेश दिले आहेत.
परिसरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी रहाटणी गांवठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना, शिवगर्जना तसेच आतिशबाजी केली. पेढे वाटुन शिवभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी नगरसेवक चंद्रकांत नखाते, सुरेश तात्या गोडांबे, वसंत नखाते, श्रीराम नखाते, रविंद्र धुमाळ, शुभम नखाते. प्रमोद नढे, राजु नढे, शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच व पदाधिकारी, पै. ॠषिकेश नखाते, पै.अमोल नखाते, पै. अनिल गोडांबे, सौरभ जाधव, महाराष्ट्र कबड्डी संघ आदी उपस्थित होते.