- जिल्हयात उत्कृष्ट काम करणारी पतसंस्था म्हणून गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयात उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून या वर्षीची प्रथम क्रमांकाची मानाची ढाल पीडीसीसी बॅंकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) झालेल्या कार्यक्रमात थोरात यांच्या हस्ते संस्थेचे मार्गदर्शक (तज्ञ संचालक) अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुडे यांनी पुरस्कार स्विकारला.
यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक मदनराव देवकाते व सुरेश अण्णा घुले यांच्या हस्ते व बँकेचे अधिकारीव मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक विजयराव टापरे, उपसरव्यवस्थापक सुधीर पाटोळे, सहा. सरव्यवस्थापक अभिजीत हेगडे व कर्ज अधिक्षक बिगरशेती विभाग अंकूश हिंगे आणि पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, खजिनदार महादेव बोत्रे आणि संचालक महाद्रंग वाघेरे, मनोज माछरे, संजय कुटे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, संचालिका चारुशिला जोशी, माजी संचालक आबा गोरे आदी उपस्थित होते.