- बसेसच्या आरक्षणासाठी वेबसाईट आणि मोबाईल अॅपचीही सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- वल्लभनगर एसटी आगारामार्फत दिवाळीसाठी जादा बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश या भागातील प्रवांशासाठी दिवाळीनिमित्त गावाला जाण्यासाठी सोयीचे ठरणार आहे. दिवाळीत गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे नियोजन केले असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
बसेसचे आरक्षण जवळच्या बस स्थानकात व वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देखील करता येईल. यासाठी https:// m. redbus.com, https:// msrtc.maharashtra.gov. in, मोबाईल अँप्लिकेशन (MSRTC Mobile Reservation – pp) वरून आरक्षण करता येणार आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार ऐनवेळी जादा बसेस सोडण्या संदर्भातही नियोजन झालेले आहे. सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, उमरगा, जळगाव या मार्गावरील फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
पिंपरी चिंचवड ते पणजी सकाळी ९ वाजता • पिपरी चिंचवड ते लातूर सकाळी ८ वाजता • पिंपरी चिंचवड ते धुळे सकाळी ९ वाजता • पिंपरी चिंचवड ते अकोला सकाळी ८ वाजता • पिंपरी चिंचवड ते अक्कलकोट दुपारी १ वाजता . • प्रवासाच्या सुरक्षेसाठी निर्जंतूक केलेल्या बसेस. माफक आणि किफायतशीर प्रवास भाडे आकरण्यात येणार आहे.


















