- आकुर्डी, भोसरी, थेरगाव व जिजामाता रुग्णालयांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार व कामकाजामध्ये सुधारणा आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी चंदीगढ येथील पदव्युत्तर संस्थेमध्ये महापालिका अधिकाऱ्यांचा दौरा आयोजित करण्यात आला. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. २२) दिली.
तसेच ते म्हणाले, महापालिकेच्या वतीने आकुर्डी, भोसरी, थेरगाव व जिजामाता रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये १ डिसेंबर पासून प्रसुती विभाग सुरू केला जाणार आहे.
त्यामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होईल. सद्यस्थितीत वायसीएममध्ये दर दिवशी ३० हून अधिक प्रसुती होत आहेत. या चार रुग्णालयांमध्ये प्रसुती विभाग सुरू झाल्यावर त्या भागातील महिलांना त्याचा फायदा होईल, असेही आयुक्तांनी सांगितले.


















