- दापोडीकरांचा पालिका भवनावर एल्गार मोर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- दापोडी पुनर्वसन प्रकल्पास नागरिकांचा विरोध असताना हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. या परिसरात मनपाच्या वतीने विकास आराखड्यात निश्चित केलेले ‘ एसआरए ‘ आरक्षण कायमस्वरूपी रद्द करावे, या मागणीसाठी दापोडी ‘ एसआरए ‘ विरोधी कृती समितीच्या वतीने आज सोमवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता पालिका भवनावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
दापोडीतील जय भिमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर परिसर नियोजित एसआरए प्रकल्पाने बाधित होत आहेत. पालिका भवनावर मोर्चा नेत हा प्रकल्प कायमचा रद्द करावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
या मोर्चात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, महिला कार्यकर्त्या आदी सहभागी झाले होते.