- महिला टीसीला निगडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- ‘मी रेल्वेत टीसी या पदावर असून तुला आणि तुझ्या भावाला नोकरी लावते’ असे आरोपी महिलेने ३२ वर्षीय फिर्यादी महिलेला सांगितलं.
नोकरीचं आश्वासन देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने स्वतःचे आणि भावाचे मिळून एकूण ८ लाख ५० हजार रुपये आरोपीला दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
मात्र, पैसे दिल्यानंतरही दोघांपैकी एकालाही नोकरी लागली नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने निगडी पोलिसात तक्रार दिली. संजीवनी पाटणे असं २५ वर्षीय आरोपी महिला टीसी अधिकाऱ्याचे नाव आहे. महिलेला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.