- अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- व्यवसाय करू देण्यासाठी तीन आरोपींनी फिर्यादीकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने आरोपींना खंडणी दिली नाही. त्यावरून आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या इतर सात ते आठ जोडीदारांना एकत्रित करून कोयते व काठ्या घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला. परिसरात दहशत निर्माण केली.
त्यापैकी दोघांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. मात्र फिर्यादी यांनी ते वार चुकवले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ही घटना सोमवारी (दि. १५) पहाटे साडेतीन वाजता काळेवाडी फाटा, डांगे चौक रोड, थेरगाव येथे घडली.
प्रतीक किरण पवार (वय २२, रा. थेरगाव गावठाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम पाटील, कृष्णा पाटील, लहू सुतार (सर्व रा. रहाटणी) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.