- भोसरीतील घटना; तरूण किरकोळ जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- घरात स्वयंपाक करताना सिलिंडर मधील गॅस संपला. त्यामुळे सिलिंडर बदलला. यावेळी गॅस गळती होत असल्याने शेगडी पेटविली असता अचानक भडका होऊन आग लागली. यात एका तरुणाच्या हाताला भाजून तो किरकोळ जखमी झाला.
खंडोबा माळ, भोसरी येथे मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ही घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. पवन तिरके (वय २५, रा खंडोबा माळ, भोसरी) असे किरकोळ जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेगडीच्या पाईप व सिलिंडरवरील रेग्युलेटरने पेट घेतला.
अग्निशामक दलाला माहिती मिळताच भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस सिलिंडर मोकळ्या मैदानात नेला. सिलिंडरवरील रेग्युलेटर काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.