न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवड स्टेशन येथील मोहननगर ते केएसबी चौक परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेचच्या ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी (दि. १५) रोजी कारवाई केली.
चिंचवडच्या मोहननगर ते केएसबी चौक येथील पदपथांवर अनेक पथारीवाले, टपरीधारक आणि दुकान चालकांनी अतिक्रमण केले आहे. अवैधरीत्या बॅनर लावल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. पदपथांवरून चालणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अतिक्रमण हटविल्याने पदपथांनी मोकळा श्वास घेतला आहे.