- ऑनलाईनसह आता ऑफलाईन दर्शनपासच्या कोट्यात वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- शिर्डी येथील श्री. साईबाबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांना दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीने १५ हजार आणि बायोमेट्रिक पध्दतीने १० हजार अशा २५ हजार भाविकांना दर्शनपास देण्यात येणार आहे.
गेल्या एक महिन्यापासून साईबाबांचे शिर्डी येथील मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दररोज पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. मात्र साईबाबा संस्थानच्या संकेतस्थळाची कुशलता तसेच दलालांच्या बनावट पासेसमुळे या कालावधीत साईभक्तांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.