- अज्ञाताविरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- अनोळखी इसमाने 8805226869 या मोबाईल क्रमांकावर फिर्यादीला फोन करून तुझ्या मुलाचा गाडी नंबर 0059 असा आहे. तुला तुझ्या पोराची काळजी नाही का. पोराची काळजी असेल ना तर पैसे पाठवून दे. मी कंपनीचा माणूस आहे. मुंबईवरून बोलतोय. पैसे पाठवून दे आणि तूच सांग किती पैसे देणार ते. मी उद्या कधी फोन करू ते तूच सांग, असे बोलून फिर्यादी यांच्या मुलाला हानी पोहोचवण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली.
आरोपीने फोनवर कंपनीचा माणूस असल्याचा उल्लेख केला आहे. ही कंपनी कोणती, आरोपी कोणत्या गुन्हेगारी टोळीशी जोडला गेला आहे का, याबाबत तपास सुरु आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि. २३) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान चिंचवड येथे घडला. बाबू सायबन्ना म्हेत्रे (वय ५६, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8805226869 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.