- चिखलीतील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- आठ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत चिखलीतील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले. हेअर कट करत असताना आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केलं, असं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
हेअर कट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आई आणि आजीला सांगितला. पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात केशकर्तनकाराविरोधात तक्रार दिली.
मोहम्मद शेबु मोहम्मद हानिफ सलमानी असं आरोपीचे नाव असून तो ‘थ्री स्टार’ नावाच्या सलूनमध्ये काम करत होता, असं पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत.