- पाऊणकोटींचा मुद्देमाल जप्त; मोशीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- शिरूरमधील घोडनदी पात्रात वाळूचा उपसा करून वाळूची चोरी केली. महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता पर्यावरणाचा -हास करून बेकायदेशीरपणे वाळू विक्रीसाठी आरोपीच्या मोशी येथील जागेत आणली. सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी ७५ लाख रुपयांचे चार ट्रक आणि एक लाख ५२ हजार रुपयांची १९ ब्रास वाळू असा एकूण ७६ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जागा मालक नवनाथ गोविंद सस्ते (वय ४१), ड्रायव्हर सतीश आजिनाथ जाधव (वय २६, दोघे रा. मोशी), ड्रायव्हर रमेश नामदेव घनवट (वय ४१, रा. सरदवाडी, ता. शिरूर), ड्रायव्हर लखन चंद्रकांत राठोड (वय २७, रा. मोशी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह ट्रक मालक अजित गोविंद सस्ते (वय ३८, रा. पाईट, ता. खेड), ट्रक मालक चेतन वाखारे (वय २८, रा. शिरूर), ट्रक मालक नितीन टेकाळे (वय ३६, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.