- विवाहितेच्या भावाची पोलिसात धाव; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- आरोपीने लग्नानंतर दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यावरून फिर्यादी यांच्या बहिणीला त्याने वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्या कारणावरून वाद काढून तिला कायम मारहाण व शिवीगाळ केली.
रोजच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यमुनानगर येथे मंगळवारी ही घटना घडली.
मृत महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन युवराज घारगे (वय ३०, रा. यमुनानगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरोेधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.