न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- पं. नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०१५ साली दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘ संविधान सन्मान दिवस ‘ म्हणुन साजरा व्हावा, असे घोषित केले. १९४९ साली आपल्या देशाला संविधान मिळालं. स्वंतत्र भारताच्या नवनिर्माणाचे कार्य याच संविधानाच्या रुपानं सुरु झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नांना यश आले.
संविधान दिनानिमित्त पिंपरी विधानसभा परिसरात शहर भाजपाच्या वतीने ३००० गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष व नगरसेविका अनुराधा गोरखे, संभाजी नाईकनवरे, शेखर साळवे, राम लोंढे, अमोल कूचेकर, प्रशांत शिंदे, राजू चौघुले व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.