- आरोपीला पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२१) :- चिखलीतील जाधववाडी येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी सायकलवर खेळत असताना आरोपीने अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करीत तिच्यावर अत्याचार केला. तो सिक्युरिटी गार्ड आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना गुरुवारी (दि. २५) रोजी घडली. पिडीत मुलीच्या आईने शुक्रवारी (दि. २६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनायक शिवाजी देशमुख (रा. आदर्श नगर, आळंदी रोड, दिघी) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलीस उपनिरीक्षक मुंडकर अधिक तपास करीत आहेत.