- चॉकलेटचे आमिष दाखवले; मुलीच्या आईने रंगेहाथ पकडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२१) :- १२ वर्षीय मुलगा हा पीडित ४ वर्षीय चिमुकलीच्या शेजारीच राहण्यास आहे. शेजारी असल्याने मुलाला पीडित मुलीच्या घरातील सर्व व्यक्ती ओळखत होते. दरम्यान, मुलाच्या घरी कोणी नसताना ४ वर्षीय चिमुकलीला त्याने घरी आणले, मुलाने चॉकलेट आणण्यास पैसे देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले अस तक्रारीत म्हटलं आहे.
अत्याचार करत असताना मुलाला पीडित मुलीच्या आईने पकडले अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. या गंभीर घटनेमुळे पालक चिंतेत होते. अखेर पोलिसात तक्रार द्यायची अस पीडित मुलीच्या आईने ठरवले. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप मुलाला ताब्यात घेण्यात आले नाही.