न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- हिंजवडीतील नारायणनगर येथे H2O नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.
या छाप्यात सहा हजारांचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप तसेच सहा हजार १७० रुपयांचे चार हुक्का फ्लेवर बॉक्स असा एकूण १२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई रविवारी (दि. २८) रात्री पावणे दहाच्या दरम्यान करण्यात आली. पोलीस शिपाई अमित जगताप यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुनेद असगर अली अन्सारी (वय ३७, रा. मिठानगर कोंढवा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.