- १४ वाहनांची तोडफोड, घरांवरही दगडफेक; परिसरात दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- दिघीत १३ जणांच्या टोळक्याने दुचाकी, चारचाकी, रिक्षा व टेम्पो, मिनी बस अशा १४ वाहनांची तोडफोड करून घरांवरही दगडफेक केली आहे. तसेच काही जणांवर कोयता आणि तलवारीने वार करून जखमी केले. त्यानंतर कबुतरखान्यास आग लावून दहशत निर्माण केली.
साईपार्क, दिघी येथे रविवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. रूषीकेश नवनाथ वाळके (वय २२, रा. साईपार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अर्जुनसिंग, संग्रामसिंग बाधा, अभिजित घोरपडे, सुरजितसिंग बाधा, करणसिंग सोन्या, संगीता कौर, गजलसिंग बाधा, हुकूमसिंग बाधा, अजयसिंग टाक आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळके हे त्यांच्या घरात होते. त्यावेळी त्यांना आरडाओरडा आणि तोडफोडीचा आवाज आला. काय झाले हे पाहण्यासाठी ते घराबाहेर आले असता आरोपींनी कोयत्याने वार करून फिर्यादीला जखमी केले. याच परिसरात राहणाऱ्या दिगंबर घनश्याम पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला.