- अखेरच्या दिवशी चक्क मतदार यादीतून नाव गायब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- माजी उपमहापौर तथा नगरसेवक डब्बू आसवाणी यांचे मतदार यादीतून नाव वगळण्यात आले आहे. मतदार नोंदणीचा आज मंगळवारी (दि. ३०) अंतिम दिनांक होता.
गेल्या आठ दिवसांपूर्वी मतदार यादीत त्यांचे नाव होते, परंतु पुन्हा आज त्यांनी यादी तपासली असता मतदार यादीतून नाव गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जाणीवपूर्वक मतदारयादीतुन नाव वगळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी मतदार यादीत नावाच्या समावेशासाठी ऑनलाईन अर्ज केला असून त्याचा ओटीपी व रेफरन्स आयडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार यादीतुन कोणी, कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी माझे नाव वगळले याचा तपास करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक डब्बू आसवाणी यांनी पालिकेच्या निवडणूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.