- आग नियंत्रणात; दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- वाकड चौकातील पवना बँकेच्या समोरील भागातील फर्निचर, गादी कारखाना, स्टेशनरी तसेच स्नॅक्स सेंटरला आज मंगळवारी (दि. ३०) रोजी साडेसहाच्या दरम्यान अचानक आग लागली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे.
आग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्थानिकांनी खाजगी टॅंकरद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पालिका व पीएमआरडीएचे व इतर एक असे तीन बंब दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर निंयत्रण मिळवले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.