- एकमेकाविरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- फिर्यादी आणि त्यांचा मामा असे दोघेजण सोमवारी (दि. २९) फिर्यादी यांच्या मावशीच्या मुलाच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यासाठी पिंपरी पुलाखाली गेले. त्यावेळी आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण केली. आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी दुसरा आरोपी हा लाकडी दांडके घेऊन मारण्यासाठी पळत आला असे फिर्यादीत म्हटले आहे.
आयान निसार कुरेशी (वय, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. शारुख कय्यूम कुरेशी (वय २५), वक्कास युसुफ कुरेशी (वय १९), अजर आमीद कुरेशी (वय २४), मुक्तार रज्जार कुरेशी (वय ४८), अकबर सादिक कुरेशी (वय २४), इस्माईल बशीर कुरेशी (वय ३६), राजू रज्जाक कुरेशी (वय ४०, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याउलट पिंपरी पुलाखाली फिर्यादीचा पुतण्या याला सर्व आरोपी मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी फिर्यादी यांचा दोघांना धक्का लागला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून सत्तुरने मारून जखमी केले. अशी परस्परविरोधी फिर्याद इस्माईल बशीर कुरेशी यांनी दिली आहे.
फैज जमील कुरेशी (वय २१), मुबीन शब्बीर कुरेशी (वय २२), आयान निसार कुरेशी (वय २१), शाबीर मंजूर कुरेशी (वय २९), वाहिद मजीद कुरेशी (वय ३२), खालिद अकील कुरेशी (वय २२), इर्शाद झाकीर कुरेशी (वय २९), जमिल अजीज कुरेशी (वय ४७), फैय्याज गफूर कुरेशी (वय ४८), मंजूर वाहब कुरेशी (वय ५६, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.