- चौघेजण अटकेत; वाकड पोलीसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- ताथवडे गावात आरोपींनी दोघांना गांजा विक्रीसाठी आणून दिला. याची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी सोमवारी (दि. २९) संध्याकाळी कारवाई करीत दोघांकडून पाच लाख १५ हजार ३७५ रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
आरोपींकडून साडेनऊ हजार रूपये रोख रक्कम आणि ८० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण सात लाख २४ हजार ८७५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस नाईक प्रशांत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील सुधाकर भापकर (वय २५, रा. काळेवस्ती, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रवीण उर्फ पवन दिलीप गाडे (वय २१, रा. माळेगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), आकाश महादेव खाडप (वय २०, रा. पवारवस्ती, ताथवडे), रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय २२, रा. ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.