- फक्त स्वच्छता व वीजबिलाचे शुल्क आकारले जाणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरात चार नाट्यगृहे आहेत. त्यात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह यांचा समावेश आहे.
या नाट्यगृहांमध्ये व्यावसायिक नाटके, सामाजिक उपक्रम, शालेय कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेला शुल्काद्वारे उत्पन्न मिळत असते. परंतु, शहरातील विविध ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी महापालिकेची नाट्यगृहे मोफत उपलब्ध करू मिळावीत, अशी मागणी केली आहे.
त्यानुसार, शहरातील जे ज्येष्ठ नागरिक संघ नोंदणीकृत असतील अशा संघांना महापालिकेची नाट्यगृहे फक्त स्वच्छता व वीजबिलाचे शुल्क आकारून इतर भाडेशुल्क माफ करून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रस्तावास महापालिका सभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली आहे.