- तरुणाच बिंग फुटल्याने तरुणी सावध; सांगवीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमोनी साईटवरून फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला त्याच्या आईच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून पैसे मागितले. फिर्यादीने देखील विश्वासाने ऑनलाईन माध्यमातून ९१ हजार रुपये आरोपीला ट्रान्सफर केले.
दरम्यान एक वर्षापूर्वी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख करून पैसे घेऊन ते पैसे परत न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याचे फिर्यादीला समजले. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला त्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालून लग्न करण्यास नकार दिला. तसेच फिर्यादीकडून घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली.
ही घटना २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली. २८ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नहुष म्हात्रे उर्फ आदित्य प्रशांत म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















