- पोलिसांकडून तीन ठिकाणी छापे; गांजासह मुद्देमाल जप्त, एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- निगडीतील साईनाथनगर येथे आरोपी हा गुटख्याची मोटरसायकलवर वाहतूक करताना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना आढळला. त्याच्याकडून ३ लाख १५ हजार १४५ रुपयांचा गुटखा, साडेआठ हजार रोख रक्कम आणि ७० हजारांची एक दुचाकी असा एकूण ३ लाख ९३ हजार ६८५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तम वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यासह दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरीतील फुगे चाळ येथे महिलेने प्रतिबंधीत तंबाखूजन्य गुटखा गिता प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात विक्रीसाठी साठवून ठेवला होता. पोलिसांनी दुकानातून ३९ हजार ११६ रुपयांचा गुटखा, २४०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शारदा गजानन रहाणे या महिलेच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरीतील लांडगे वस्ती येथे कारमधून प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्यासाठी नेताना एकाला ताब्यात घेतले. आणखी एकाच्या खोलीत गुटखा ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ६०० रुपयांचा गुटखा आणि एक लाख २० हजार रुपयांची कार असा एकूण २ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अभिजीत उर्फ पप्पू भोरसह आणखी एका साथीदाराच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण सहा लाख ५५ हजार ८०१ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
















