- महापौर उषा ढोरे यांचे शहरवासियांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपा शास्तीकर रक्कमेमध्ये सवलत देणेबाबत अभय योजना राबविण्यात येत आहे. ही सवलत सर्व मिळकतधारकांसाठी आहे. तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छीणा-यांनी आपल्या नजीकच्या कर संकलन विभागीय कार्यालयात थकबाकीसह एक रकमी मिळकतकर भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच ना. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी / फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणी मा. न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो.
विहित मुदतीत मिळकतकराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ मधील नियम ४१ नुसार प्रती महा २ टक्के दराने मनपा कर शास्ती/ विलंब दंड आकारणेची तरतूद आहे. थकबाकीदार मिळकतधारकांकडून वर्षानुवर्षे मिळकतकराचा भरणा होत नसल्याने मिळकतकराचे थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशी पूर्वखटला प्रकरणे तडजोडी करिता शनिवार, (दि. ११) रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत दाखल करणेत येणार आहे.
लोकअदालती अंतर्गत तडजोडीकरिता एकूण ३९३७० थकबाकीदार मिळकतधारकांना नोटीस / पत्र निर्गत करण्यात येत आहे. लोकअदालतीचे अनुषंगाने (दि.०६) ते (दि. ११) पर्यंत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रक्कमी १०० टक्के रक्कम भरलेनंतर भरणा दिनांकापर्यंत आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. सवलत ही अवैध बांधकाम शास्ती कराकरिता नसून लोकअदालतचे कामकाज त्या त्या संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयामध्ये होणार आहे.
















