- आकुर्डीतील घटना; दुचाकीसह साहित्य जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२१) :- आकुर्डी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना अॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोर एक तरुण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
संबंधित आरोपीकडे एक लोखंडी पटाशी, प्लास्टिक ब्लेड कटर, पेपर स्प्रे, लोखंडी पाना, लोखंडी वायर कटर, कात्री, नायलॉन रस्सी, मोबाईल फोन, स्क्रू ड्रायव्हर असा ऐवज मिळून आला. पोलिसांनी हा ऐवज आणि त्याची दुचाकी जप्त करत त्याला अटक केली.
ही घटना शनिवारी (दि. ४) मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान घडली. पोलीस नाईक सुनील जाधव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी आनंदा धस (वय २३, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















