- पोलीस आयुक्तांकडून तडकाफडकी धाडसी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२१) :- तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसीबीने सापळा लावून याप्रकरणी कारवाई केली होती.
महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. पोलीस आयुक्तांनी दोघांना पोलीस सेवेतून निलंबित केले.
एसीबीने उपनिरीक्षक महिलेला शुक्रवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सोळुंके आणि देसाई हे सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी ४२ वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
















