- पोलिसांनी तिघांना केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२१) :- आयशर टेम्पोमधून कोल्हापूर ते मुंबई माल घेऊन जात असताना सोमवारी पहाटे तीन तरुणांनी मुंबईकडे जाण्याच्या बहाण्याने हात करून फिर्यादी यांच्या टेम्पोला थांबवले. फिर्यादी यांनी तिघा तरुणांना प्रवासी म्हणून घेतले.
पुनावळे अंडरपास ब्रिजवर आल्यानंतर तिघा प्रवासी तरुणांनी फिर्यादी यांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवला. जबरदस्तीने फिर्यादीकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण चार हजार १०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. युवराज लेसु राठोड (वय २८, रा. कृष्णानगर, उंब्रज, ता. कराड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार वैभव गणेश लबडे (वय २८), सागर संजय अडागळे (वय २३), दिनेश सुमंतराव गोगावले (वय ३४, रा. हडपसर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.