- भाजपकडून महावितरण कार्यालयावर आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२१) :- घरकुलमधील नागरिकांना भरमसाठ वीज बील येत आहे. त्याची जबरदस्तीने वसुली केली जात आहे. तक्रार करण्यासाठी घरकुलपासून सहा किलोमीटर असलेल्या मोशी येथे जावे लागते. तेथून थरमॅक्स चौकातील कार्यालयात पाठविले जाते. यात नागरिकांचा वेळ, पैसा वाया जाता आणि मनस्तापही सहन करावा लागतो.
कोरोनामुळे मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. आयटीमधील काही मुलांचे घरुनच काम चालू आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वाढीव बील आहेत. आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या नागरिकांना भरमसाठ वीज बिलामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसांमध्ये घरकुलमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची स्वाक्षरी आहे.