- पत्राशेड, वीट आणि आर.सी.सी. बांधकामांवर हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने आज मंगळवारी (दि. ७) रोजी प्रभाग २ मधील कुदळवाडी परिसरातील रस्ता रुंदीकरणातील सुमारे वीस पत्राशेडवरील चाळीस हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणात असणारे सुमारें २० अनधिकृत पत्राशेड या कारवाईत पाडण्यात आले.
जाधववाडी, कुदळवाडीमधील गट.नं. ६८८ पै. व ६८० पै. ३०.०० मी. डि.पी. रस्त्याने बाधित असलेले अनधिकृत बांधकामे (पत्राशेड) इत्यादीवर निष्काशनाची कारवाई करणेत आली. या कारवाईमध्ये एकूण १२ पत्राशेड, ०४ वीट बांधकाम, ०२ आर.सी.सी. बांधकाम निष्कासित करणेत आले. या कारवाईचे एकूण क्षेञफळ अंदाजे ३८,००० चौ.फु. आहे.
सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.अभियंता, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता सुधीर मोरे, क. अभियंता अमोल पडलवार व इतर ४ कनिष्ठ अभियंता, १२ बिट निरीक्षक, क व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे २८ पोलिस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय १, पोलीस कर्मचारी ५, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक ५८, अग्निशामक दलाचे पथक व वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर २५, जे.सी.बी ५, पोकलेन २,
डंपर ०३, गॅस कटर १, क्रेन २ यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.