- मोशीतील घटना; तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- दोन आरोपींनी एकाला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली. हा आरोपी पिंपरी चिंचवड शहरात ही उलटी बेकायदेशीरपणे विकणार होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी मोशी टोलनाका येथे सापळा लावून एकाला ताब्यात घेतले.
आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी १० लाख रुपये किमतीची व्हेल माशाची ५५० ग्रॅम उलटी जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ६) सकाळी मोशी टोलनाका येथे करण्यात आली. पोलीस शिपाई प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जॉन सुनील साठे (वय ३३, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकूमचंद बागमार (वय ६१, रा. कारंजा नाशिक), मनोज अली (रा. भिवंडी नाशिकफाटा पिंजारवाडी) यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६) (सी) ९, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















