न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २५. जाने.) :- चिंचवड येथील कार्निवल सिनेमा बिग बझार येथे सव्वा बाराच्या खेळाला बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
या खेळासाठी शिवसेना, विभागप्रमुख, आजी माजी पदाधिका-यांनी बुकिंग केले होते. त्यामुळे सकाळपासूनच चित्रपटगृहांसमोर भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. ढोल ताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात प्रेक्षकांचे स्वागत करून चित्रपटासाठी वातावरणनिर्मिती करण्यात आली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहर संघटिका ऊर्मिला काळभोर, सरिता साने, शिवसेना सल्लागार मधुकर बाबर, बाळासाहेब वाल्हेकर, विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संतोष सौंदणकर, संघटक रोमी संधू, जितेंद्र ननावरे, नवनाथ तरस, अमोल निकम, तुषार नवले, विजय साने, भाविक देशमुख, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, आदी आजी माजी विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











