न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या कामांचा आढावा न घेता नवीन काम सुरू करण्यावर जोर दिला जातो. यंदा मात्र, काम सुरु झाल्यापासून त्यांचा वित्तीय प्रगतीनिहाय आढावा घेतला जाणार आहे.
त्यामुळे महापालिकेने संबंधित कामांवर, प्रकल्पांवर किती खर्च केला, त्याची फलनिष्पत्ती काय? देयकांच्या बदल्यात कामे किती झाली? हे समजणार आहे. यासाठी शहर परिवर्तन कार्यालयामार्फत स्वतंत्र ‘डॅश बोर्ड’ तयार केला आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१९-२०२० या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात स्थायी समिती समोर सादर केला जाणार आहे. रोख प्रवाह (कॅश फ्लो) संकल्पनेवर भर देत अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे.















