न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जाने.) :- प्रजासत्ताक दिनानिम्मित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उद्या शनिवार (दि. २६) रोजी निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर सामुहीक गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
शिक्षण विभागाच्या पुढाकाराने मनपाच्या शाळेतील एकूण ९ हजार ७५० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सकाळी आठ वाजता ध्वजवंदन होणार आहे. मुलांना निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर येण्यासाठी व कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी १०९ पीएमपीएमएल बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.











