- डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्या ग्रंथाचे प्रकाशन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२१) :- सा. विवेक प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, दि. १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वा. हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचे आयोजन एम.जी.डी.मिशन इंडिया च्यावतीने करण्यात आले आहे, अशी माहिती एम जी डी मिशन चे संचालक तथा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे व एम जी डी मिशन संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.