- सात वर्षीय मुलाचा मृत्यू; काळेवाडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२१) :- काळेवाडी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात असतना बुधवारी (दि. ८) पहाटे साडेचारच्या दरम्यान पुण्याकडून सर्व्हिस रोडने एक कार भरधाव वेगात आली. कारने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले आहेत.
कनवरलाल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.