न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत बोऱ्हाडेवाडी येथे आज गुरुवारी (दि. ९) रोजी प्रभाग २ मधील अनधिकृत बांधकामांवर निष्काशनाची कारवाई करणेत आली.
या कारवाईमध्ये एकूण ०८ आर.सी.सी. पक्की दुमजली, तिनमजली अनधिकृत बांधकामे निष्कासित करणेत आली. या कारवाईचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १४७६०.०० चौ. फुट आहे.
ही कारवाई सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.अभियंता, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता सुधीर मोरे, हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य व इतर ०३ कनिष्ठ अभियंता, १२ बिट निरीक्षक, क क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे ०६ पोलिस कर्मचारी, भोसरी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनचे पी. एस. आय १ (रामदास जाधव), महिला व पुरुष पोलीस कर्मचारी ०५, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षा जवान, क क्षेत्रीय कार्यालय-२५, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षा अधिकारी ०२, अग्निशामक दलाचे पथक व वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर १०, जे.सी.बी ०१, पोकलेन १ आदी मशीनरी यांच्या सहाय्याने करण्यात आली