- १ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर दरम्यान चिंचवडला सर्वाधिक मतदार नोंदणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये प्रस्तावित असल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी उपक्रम सुरू आहे. मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात पिंपरी – चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील ५० हजार नागरिकांनी अर्ज केला. त्यात नाव यादीतून काढण्यासाठी ७१५ जणांनी अर्ज केला आहे. सर्वाधिक अर्ज चिंचवड विधानसभेत दाखल झाले आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित आहे. त्यानुसार प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. भोसरीत निवडणूक कर्मचाऱ्यांची निर्णय अधिकारी, प्राधिकरणातील हेडगेवार भवनात पिंपरी विधानसभा, आणि थेरगाव येथे चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे.
दि. १ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर याकालावधीत अभियान राबविले. त्यात ६० हजार अर्ज आले आहेत. त्याची छाननी, सुनावणी सुरू आहे. या अभियानात शहरात चिंचवड विधानसभेत मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक नोंदणी ही चिंचवडला आहे. ३२३९५ नागरिकांनी अर्ज दिले आहेत. पिंपरी विधानसभेत १८०२० जणांनी अर्ज सादर केले आहेत. विधानसभेनुसार ही जिल्ह्यात सर्वाधिक आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
ऑनलाइन मतदार नोंदणीची मुदत संपली आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू आहे. यानंतर काही अर्जाबाबत आक्षेप किंवा त्रुटी असतील तर त्यासाठी नागरिकांना सुनावणीसाठी बोलावण्यात येईल. त्यास नागरिकांनी उपस्थित राहावे. त्यातून नोंदणीची प्रक्रिया वेगाने होईल. ५ जानेवारीला मतदर यादी प्रसिद्ध करण्याचा आयोगाचा प्रयत्न असणार आहे.
– स्मिता झगडे, उपायुक्त, मतदार नोंदणी…