- दुचाकीस्वारासह महिला गंभीर जखमी; वाकडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- मादक पदार्थाच्या नशेत असणारा दुचाकी चालक दुचाकीवरून मुलीला घेऊन जात असताना नशेतच त्याने दुचाकी भरधाव चालवली. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली.
यात मुलीच्या डोक्याला, पोटाला, हाता-पायाला मार लागून गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी दुचाकीस्वार देखील जखमी झाला. आरोपी तरूण आणि फिर्यादीची मुलगी हे दोघे मित्र आहेत. वाकड येथे हिंजवडी-वाकड रस्त्यावर गुरुवारी (दि. ९) रोजी ही घटना घडली.
अजिंक्य रामदास संकपाळ (रा. शेखवस्ती, वाकड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेचे वडील रमेश धनपाल भोकरे (वय ५९, रा. गारगोटी, ता. भुदरगड, कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.