- होमगार्ड तरुणाचा जागीच मृत्यू; ट्रक चालकाचा पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- निगडीतील पवळे उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात असताना एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तरूणाच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. मृत व्यक्ती हे होमगार्ड होते. रविवारी (दि. १२) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
तेजस ओमप्रकाश लेले (वय ३२, रा. माळीनगर, वडगाव मावळ), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. देवेंद्र अरुण कुरुमभट्टी (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.