- रस्त्यावरील कोंडीमुळे वाहतूक शाखेचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२१) :- पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर / ट्रॉली यांना सकाळी ०९.०० ते १३.०० व सायंकाळी १७.०० ते २१.०० वा दरम्यान पुढील आदेश होईपर्यंत महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पीटल डांगे चौक, भुमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शनवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस उप-आयूक्त, वाहतुक शाखा यांनी याबाबत आदेश काढले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऊस वाहतूक करणार्या ट्रक व ट्रॅक्टरची संख्या प्रमाणात आहे. ही वाहने नियमीत ऊस वाहतूक करत असतात.
तसेच वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने व ट्रॉली जोडल्याने ती संथ गतीने जात असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होवुन वाहतुककोंडी होत असते.
















