न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- शिवशाही व्यापारी संघाची औरंगाबाद येथील सिंचन शासकीय विश्रामगृह, संभाजीनगर येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ॲड. अंजली साईनाथ पानसरे (साबळे) यांची संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या महीला आघाडी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
यावेळी प्रदेश सचिव गणेश आहेर, रविकिरण घटकार, शिवशाही व्यापारीसंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख, माजी अध्यक्ष बबलु वाणे, मारूती मस्के, अंजली पानसरे, राजन उबाळे, शिवकन्या साबळे, सागर बनसोडे, आनंद मस्के व आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे तसेच सर्वसामान्य जनतेचे रक्षण करून, त्यांच्या हिताचे काम करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा झेंडा फडकविण्यासाठी व उध्वजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











